Home Cities चोपडा आर्किड स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

आर्किड स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

0
102

school 1

चोपडा प्रतिनिधी । येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आज दि. 23 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पिता पालकांसाठी मोहक मुरली डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महावीर जैन यांचा प्रथम क्रमांक, सिद्धार्थ वाघमारे यांचा द्वितीय क्रमांक आणि चेतन कुमार जैन आणि तुकाराम लवटे यांचा तृतीय क्रमांक आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिनानिमित्त शाळेतील चिमुकले राधा आणि कृष्ण यांच्या वेशभुषेत आले होते. विद्यार्थ्यांनी कृष्ण गीतांवर नृत्य सादर केले. आणि मटकी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद घेण्यात आला. कृष्णाच्या घोषणांनी सगळे वातावरण कृष्णमय बनले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप केले.  याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, डॉ. तृप्ती पाटील, शाळेच्या प्राचार्य मिस परमेश्वरी उपस्थित होते. दिपाली पाटील आणि लिपीका नागदेव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितेश वाघ, रिया कलानी, श्रद्धा देशमुख, सपना पवार आणि अनिता पवार आदींनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound