मराठा आरक्षणांसाठी चढलो सुप्रीम कोर्टाची पायरी – खा. भोसले

sanbhajiraje raver

रावेर प्रतिनिधी । येथे मराठा समाज विकास मंडळातर्फे विद्यार्थांचा गुण-गौरव व देणगीदारांचा सन्मान कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला खा. संभाजीराजे भोसले यांची विशेष उपस्थिती असून ते म्हणाले, महाराष्ट्रातील शैक्षणिक मागासलेल्या मराठा समाजाचे आरक्षण टिकावे म्हणून आयुष्यात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची पायरी चढलो.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा समाजाची बाजू कोर्टात ठासुन मांडली आहे. यापूर्वी शाहु महाराजांनी 1902 मध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. यामध्ये शैक्षणिक मागासलेले सर्व जाती होत्या, तरीसुध्दा मराठा समाजाच्या आरक्षणाला काही लोक सुप्रीम कोर्टात विरोध करत असले तरी ही लढाई आपण न्याय हक्काने जिंकू असे आश्वासन छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी समस्त मराठा समाजाला दिले आहे. पुढे म्हणाले की, सर्व प्रथम मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून 2007 पासुन मी जनजागृती करत आहे. त्यानंतर राज्यात 58 मोर्चे निघाले. मराठा समाज एकवटले आणि सरकारला आरक्षण देण्यास भाग पडले. त्यामुळे आयुष्यात कधीही खचून जाऊ नका, पुढे चालत रहा, यश तुमच्या पायशी येईल, असे विद्यार्थांना अवाहन केले. कोल्हापुर येथील पुरग्रस्त भागांसाठी राजेंद्र चौधरी यांच्या तर्फे 21 हजाराची मदत छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी.आ. अरुण पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, सुहास महाजन, डॉ. राष्ट्रवाजी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, गोपाळ दर्जी, जि.प.सदस्या रंजना पाटील, पी.टी.चौधरी प्रकल्पधिकारी विनीता सोनवणे, नगराध्यक्षा शोभाताई लांडे, राजेंद्र चौधरी, डी.सी.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सामाजाचे सुनिल कोंडे, विलास ताठे, निळकंठ चौधरी, योगेश महाजन, प्रशांत पाटील, घन:श्याम पाटील, प्रभाकर पाटील, सचिन पाटील, विनोद पाटील, प्रभाकर पाटील, प.स.सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, व्ही.पी महाजन, संतोष महाजन, गोपाळ महाजन, यादवराव पाटील व युवराज महाजन यांच्यासह आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर.बी. महाजन आणि शेखर पाटील यांनी केले आहे.

Protected Content