आव्हाणे फाट्यावरून एकाची मोटारसायकल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे फाट्याजवळून एकाची १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र यशवंत सपकाळे (वय-४२) रा. खेडी खुर्द ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, सोमवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मच्छिंद्र सपकाळे हे त्यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ सीबी ५०६३) ने जळगाव ते कानळदा रस्त्यावरील आव्हाणे फाट्याजवळ कामानिमित्त आले होते. त्यांनी मोटारसायकल फाट्याजवळच उभी केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी या परिसरात शोधाशोध केली. परंतू मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहे.

 

Protected Content