भरती प्रक्रियेतील शुल्क कमी करण्याची मागणी

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्या राज्यात विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र सदर भरती प्रक्रिया एक खाजगी कंपनी राबवित असल्याने उमेदवारांकडून अव्वाच्यासवा परीक्षा फी आकारण्यात येत आहे. सदरची फी कमी करावी अशी मागणी छात्र भारती संघटनेने आ. किशोर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या सरळसेवेची मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातील काही विभाग जसे सध्या वन विभागाची जाहिरात आली आहे. काही नगर पालिकेच्या ही जागा आल्या होत्या. मात्र त्यासाठी भरमसाठ चलन घेतले जात आहे. सध्या टी. डी. एस. ही कंपनी या परीक्षा घेत आहे. मात्र मागासर्गीयांसाठी ९०० रुपये आणि सर्वसाधारण १ हजार रुपये चलन घेतले जात आहे. आणि हे चलन सर्वसाधारण आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थी, शेतकरी / हातमजुरी चे मुल इतके चलन भरण्यास असमर्थ आहेत. पहिलेही सरकारी नोकऱ्यासाठी श्रीमंत व्यक्ती या नोकऱ्या करू शकत होते आणि आता कंपन्याच्या भरमसाठ चलनामुळे तेच होईल. हे असच सुरू राहील का ? श्रीमंत अजून श्रीमंत आणि गरीब
अजून गरीब असेल ? ही परिस्थिती बदलण्यासाठी कृपया आपण या चलनाच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष
द्यावे. आणि खरंच कंपनीला एका व्यक्तीसाठी आणि फक्त ६०/९० मिनिटांच्या परीक्षेसाठी येवढे चलन
खरंच लागू शकते का ? मागील काही वर्षात चलनाचे मूल्य २५०/३०० रुपये होते. मात्र सध्या काय ही परिस्थिती ? आणि केंद्राच्या ही जागा साठी किंवा एम. पी. एस. सी. (२९४ रुपये), यु. पी. एस. सी. (१०० रुपये) च्या परीक्षेसाठी ही इतके चलन असते मग या सरळ सेवेसाठीच इतके चलन का ? आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, सरळसेवेसाठी सर्वात जास्त विदयार्थी प्रयत्न करतात. आणि त्याचे सर्वांचे स्वप्नावर पाणी फिरू नये याची काळजी घ्यावी. कृपया यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा. कारण त्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये. विद्यार्थ्याच्या फॉर्मची मुदत संपण्या अगोदर कृपया आपण निर्णय द्यावा. तसेच यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्यंत आमची मागणी पोहोचवावी अशा आषयाचे निवेदन छात्र भारती संघटनेतर्फे आ. किशोर पाटील यांना देण्यात आले.

निवेदन देते प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, जिल्हा संघटक चंचल सोनवणे, सीमा शिरसाठ, तालुकाध्यक्ष भुषण पाटील, इंदिरा देवरे, ऐश्वर्या पाटील, भाग्यश्री देवरे, मयुरी जगदाळे, किर्ती तांबे, अजय हटकर, सागर पाटील, सुशिल दोडके, चेतन काटे, नितीन पाटील, तेजस पाटील, रोहीत चौधरी, चेतन वाणी, गोपाल कोळी, गणेश कोळीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content