ऑर्कीड हॉस्पिटल येथून महिलेची दुचाकी लांबविली; जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ऑर्किड हॉस्पिटल येथून महिलेची दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भावना दिलीप शर्मा (वय-४८, रा.विद्यानगर बालमोहन शाळेजवळ पिंप्राळा) ह्या महिला एका दैनिकात मॅनेजर म्हणून काम करतात. ऑफिसच्या कामानिमित्त १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील ऑर्किड हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. त्यानंतर काम आटोपून अर्ध्या तासात म्हणजे ११.३० वाजेच्या सुमारास त्या दुचाकी जवळ आले असता त्यांची (एमएच १९ बीझेड २०३) क्रमांकाची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करून देखील दुचाकी मिळून न आल्याने जिल्हापेठ पोलिसात चोरी झाल्याची तक्रार दिली. ९ दिवसानंतर मंगळवारी दुपारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भावना शर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि पुरुषोत्तम वागळे करीत आहे.

Protected Content