एरंडोल येथे नूतन लसीकरण मोहिमेबाबत नियोजन

एरंडोल प्रतिनिधी । येथील प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी नुकतीच तालुक्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, नगर पालिका मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुयोग्य असे नूतन लसीकरण मोहिमेबाबत नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्याबाबत शासनाचा मानस असल्याने व ४५ वर्ष वय असणाऱ्या नागरिकांना लसीकरण सुरु असताना तसेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात सद्य स्थितीत नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याने व ग्रामीण रुग्णालयात डी.सी.एच.सी. व्यवस्था असुन तेथे ऑक्सीजन ची गरज असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे एकच वेळी एकच गर्दी होऊन सोशल distancing चे पालन होणार नाही. त्यामुळे एरंडोल शहरातील डी.डी.एस.पी.महाविद्यालय म्हासावद नाका येथे लसीकरण केले जाणार आहे.

यात खोली क्र.२,५ व ८ तसेच व्हरांडा, महाविद्यालयाचे गेट पर्यंतचा परिसर अधिग्रहित करण्यात आला आहे.यासाठी वैद्यकीय अधीक्षक एरंडोल यांनी ताबा घेण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत. तसेच याठिकाणी कोरोना चाचणी, लसीकरण नोंदणी,लसीकरण डोस क्र.१ व २  कक्ष या प्रमाणे विभाग असणार आहे. तसेच मेन गेट पासून बरिकेट लाऊन महिला व पुरुष असे स्वतंत्र डोस क्र.१ व २ करण्यात येणार आहे.याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विषयवार फलक, वेळोवेळी सनिटायझेशन, लाऊस्पिकरच्या सहाय्याने सूचना देणे, अग्निशमन व इतर अनुषंगिक व्यवस्था,पोलीस बंदोबस्त, सदर ठिकाणी कुठल्या नागरिकाची तब्येत बिघडली तर त्यासाठी डॉक्टर असतील, आदी व इतर अनेक व्यवस्था याठिकाणी होणार आहे.

सदर लसीकरणाच्या नियंत्रण अधिकारी तहसीलदार असणार आहे.तसेच दररोज ची लसीकरण बद्दल माहिती डॉ.मुकेश चौधरी हे देणार आहेत.तसेच वीज मंडळ यांच्या तर्फे एक वायरमन त्याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बद्ध नियोजन करण्यात आले आहे.

 

Protected Content