राज्यावर कोरोनाचे संकट , अशा गोष्टींपासून दूर राहावं ; खडसे , महाजनांना गुलाबराव पाटलांचा सल्ला

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  “एकनाथ खडसे यांची ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं मला समजलं. सध्या राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सध्यातरी या सगळ्यापासून दूर राहायला हवं,” असा सल्ला पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील  यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव  खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना दिला.

 

खडसे  आणि  महाजान यांचं राजकीय वैर लपून राहिलेलं नाही. खडसे यांच्या व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लीपमधून ते पुन्हा दिसले. खडसे यांनी  महाजन यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधानं केली. खडसेंच्या या क्लीपनंतर खळबळ ऊडाली. याच क्लीपविषयी विचारले असता गुलाबराव पाटील यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत ‘बोलत होते.

 

राज्यातील कोरोनास्थिती आणि लसीकरणावर चर्चा करण्यासाठी आज  राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राज्यात राबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. गुलाबराव पाटील लसीकरणाची माहिती ‘ देत होते. यावेळी त्यांना  खडसे यांच्या  व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीप बद्दल विचारण्यात आले. यावर भाष्य करताना “एकनाथ खडसे यांची ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं मला आत्ताच समजलं. या दोघांचं युद्ध नेहमीच सुरु असतं. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याला कोरोनापासून दूर कसं ठेवता येईल, हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे सध्यातरी अशा गोष्टींपासून दूर राहायलं हवं,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

 

 

एकनाथराव  खडसे  यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. यामध्ये त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन याच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधानं केली आहेत.  तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का , असे खडसे म्हणाले.  गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले.  आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.

 

ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी तो आवाज माझाच असल्याची कबुली दिली. खानदेशी भाषेत आपण ‘ अमका तमका मेला का?’, असे सहज म्हणून जातो. ही बोलीभाषा आहे. त्यामुळे यामध्ये काही विशेष नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

Protected Content