एमआयडीसीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीविठ्ठल नगरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

रघुनाथ जयराम चव्हाण (वय-५५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, हरीविठ्ठल नगरातील रहिवाशी रघुनाथ चव्हाण हे आपल्या पत्नी मिनाक्षी, लहान मुलगा कुणाल यांच्यासह वास्तव्याला आहे.  एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे. शुक्रवार १ एप्रिल रोजी रघुनाथ चव्हाण हे दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी कंपनीतील काम आटोपून घराकडे निघाले होते. दरम्यान, घरी येत असतांना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. एका खासगी रिक्षाचालकाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांची मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहे.

Protected Content