राष्ट्रीय महामार्गावरून एकाची रिक्षा लांबविली

जळगाव –  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा भागात पार्किंगला लावलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, विनोद लोटू पवार (वय-३९) रा. रथ चौक, बारीवाडा, पिंप्राळा हे रिक्षाचालक असून त्यांच्याकडे (एमएच  १९ बीयू ८६२३) क्रमांकांची बजाज ट्री व्हिलर रिक्षा आहे. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३० मार्च रोजी रात्री १०.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील सिद्धिविनायक हॉस्पिटल तांबापुरा येथे त्यांनी रिक्षा पार्किंग करुन लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवार ३१ मार्च रोजी समोर आली. त्यांनी परिससरात शोधाशोध केली परंतु रिक्षा कुठेही आढळून आले नाही. अखेर शुक्रवारी १ एप्रिल रोजी एक एप्रिल रोजी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इम्रान सय्यद करीत आहे.

Protected Content