भगवी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव येथील शिलेदारांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील चाळीसगाव जवळील कन्नड घाटात असलेल्या ऐतिहासिक मल्हार गडावर भगवी गुढी उभारून येणाऱ्या नववर्षाचे स्वागत केले.

आज दि. २ एप्रिल रोजी पहाटे सहा वाजता मल्हारगड येथे नववर्षाच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने सह्याद्री प्रतिष्ठान व चाळीसगाव येथील सायकल क्लबच्या सदस्यांनी हा सोहळा साजरा केला. गडावर कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर भगवा ध्वज लावून पुष्पहार गुलाल भंडारा उधळीत छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जय घोषांच्या घोषणा देत नववर्षाचे स्वागत करीत सर्व सदस्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला. यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या असंख्य सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला.

Protected Content