पहूर येथे भरदिवसा एकावर कोयत्याने हल्ला

pahur crime 1

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । मालवाहतूक पियाजो रिक्शा चालकावर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज दूपारी 2 वाजेच्या सुमारास येथील अजिंठा पेट्रोल पंपावर घडली.

store advt

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी दोनच्या सुमारास अजिंठा पेट्रोलपंपावर मालवाहतूक रिक्शा घेऊन डिझेल भरण्यासाठी आलेल्या राजमल अर्जुन बोरसे (वय २८) रा. लोंढरी ता.जामनेर या तरुणावर अज्ञात व्यक्तीने कोयत्याच्या सहाय्याने पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला वाचविण्यासाठी आजू-बाजूच्या लोकांनी धाव घेतली. जखमी तरुणास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हालविण्यात आले असून डॉ. मंजूषा पाटील व कर्मचाऱ्यांनी उपचार केले. पुढील उपचारासाठी जखमीस सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, आरोग्य दूत अरविंद देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमलेली होती.

रूग्णवाहिका बंद
पहूर ग्रामिण रुग्णालयाची रुग्णवाहीका तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तर १०८ रूग्णवाहीका डॉक्टरांअभावी बंद असल्यामुळे जखमीस खासगी वाहनाद्वारे जळगावला हलविण्यात आले. दरम्यान रुग्णवाहीके अभावी रुग्णांचे हाल होत असल्याने रुग्णवाहिकेची सेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!