चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ गावात कौटुंबिक वादाच्या कारणावरून एका वृध्द महिलेला पाच जणांनी शिवीगाळ व मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ गावात बन्सीबाई सोमनाथ पवार वय ६८ या वृध्द महिला आपल्या परिवारासह वाास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता कौटुंबिक वादाच्या कारणावरून गावात राहणारे संतोष भिवसन राठोड, निलेश संतोष राठोड, निर्मला संतोष राठोड, नेहा निलेश राठोड आणि प्रविण संजय राठोड या पाच जणांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत वृध्द महिलेला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता वृध्द महिलेने चाळीसगाव ग्रामीण पोलीसात तक्रार दिली.त्यानुसार संतोष भिवसन राठोड, निलेश संतोष राठोड, निर्मला संतोष राठोड, नेहा निलेश राठोड आणि प्रविण संजय राठोड सर्व रा. आंबेहोळ ता. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप माने हे करीत आहे.