भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्युज । भुसावळ शहरातील चौक बाजार येथून घराच्या डक मधून आत प्रवेश करत ५१ हजार ५०० रुपये किंमतिचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकिस आली आहे. याप्रकरणी रविवारी १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की , सुदामा ठाकुरमल बडेजा वय-66 रा. आदर्श नगर भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चौक बाजार येथील कॉस्मेटिक व गारमेंट दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ८ ते ९ डिसेंबर रोजीच्या दरम्यान त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आला. त्यानुसार सुदामा बडेजा यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.