भाजप कार्यालयात लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना अभिवादन

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | लोकनेते माजी उप मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांना जयंती निमित्त भाजप कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

भाजप कार्यालयात सर्वप्रथम लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे खामगाव भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, विधानसभा विस्तारक डॉ एकनाथ पाटील, माजी कृ उ बा स संचालक दिलीप पाटील, भाजयूमो शहराध्यक्ष राम मिश्रा, माजी जी प सदस्य पुंडलिकराव बोंबटकार, ज्ञानदेवराव चिमणकार, संजय ठोंबरे, अनिस जमादार,सुधीर खवले, दीपक नरवाडे, मुरलीधर हंतोडे, दिगंबर लोनाग्रे, किसन खाळपे, प्रल्हाद फासे, कैलास बगाडे, प्रल्हाद कवळे, आदींनीही लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Protected Content