विनापरवाना कीटकनाशके व खत विक्री करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवर असलेल्या रोहनवाडी परिसरात विनापरवाना रासायनिक खते व कीटकनाशके विक्री करणाऱ्या ५ जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी १५ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील कानळदा रोडवर असलेल्या रोहनवाडी येथील रवींद्र चौधरी यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काहीजण विनापरवाना शेतीसाठी लागणारे खत पीकवाढ, संजीविके व कीटकनाशक शेतकऱ्यांना विक्री होत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना मिळाली.  जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी कारवाईच्या सूचना गुणवत्ता नियंत्रण पथकाला दिल्या. त्यानुसार पथकाने शुक्रवारी २३ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता पथकाने कारवाई करत छापा टाकला. यावेळी विनापरवाना खत कीटकनाशक व संजीविके विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महेश माटे रा.  पिंप्राळा, देविदास भावसार रा. खोटे नगर अरविंद माचे, रा.महीसागर आणि  निमेश भोई रा. जळगाव यांच्या विरोधात शुक्रवार २३ जून रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

Protected Content