मंगल कार्यालयाजवळून वृध्दाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील गुंजन मंगल कार्यालयाजवळून वृध्दाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीकांत शिवनारायण भुतडा (वय-६२) रा. प्रेम नगर, जळगाव हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. सोनेचांदीचे दागिने बनविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता कामाच्या निमित्ताने शिरसोली रोडवरील गुंजन मंगल कार्यालयाजवळ दुचाकी क्रमांक (एमएच १९ टी ८०७२)ने आले. त्यांनी दुचाकी पार्कींगला लावून कामानिमित्त निघून गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी संपुर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू त्यांना दुचाकी मिळून आली नाही. अखेर सोमवारी ११ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Protected Content