पाचोरा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

पाचोरा/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा शहरातील भारत डेअरी बसस्टॉप जवळ व नागसेन नगर येथील दिपक बागुल व राजेश खैरनार या गावठी दारू विक्रेत्यांवर आज कारवाई करण्यात आली.

पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी विभागाचे पोलीस कर्मचारी गिरीश पाटील, नंदू पवार यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार कारवाई केली आहे. यामध्ये तयार  गावठी दारू विक्रेत्याकडून ६० लीटर गावठी पोटलीसह तयार ३३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू असून ‘शासन आपल्या दारी ‘ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यात देखील गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचे धाडसत्र राबविण्यात आले.

Protected Content