दुचाकी चोरास १ वर्षाची शिक्षा : पाचोरा न्यायालयाचा निकाल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनीधी |   येथील न्यायालयाने आज दि. २९ सप्टेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशन अंतर्गत झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात आरोपीस १ वर्षाची शिक्षा सुनावली.

 

दि. २४ जुन २०२२ रोजी तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) येथील पोलिस स्टेशनमध्ये सोनु गोविंदा भोई याच्या विरूध्द मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक रविंद्रसिंग पाटील यांनी करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपणपत्र  दाखल केले होते. या खटला न्यायधिश श्रीमती एम. जी. हिवराळे यांचे न्यायालयात चालला. सरकारपक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षातर्फे आलेला पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी सोनु गोविंदा भोई यास १ वर्षाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सरकारी वकिल अनिल पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक फौजदार प्रदिप पाटील व पोलिस नाईक राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

 

Protected Content