रावेर पोलिसांनी केला अवघ्या पाच तासात गुन्हा उघड

रावेर, प्रतिनिधी । आज गुरुवार ५ मार्च रोजी सकाळी ४ वाजून ४० मिनिटांपूर्वी कुंभारवाडा मधील एका घरातून सोने-चांदी व रोख रक्कम अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तपासचक्र फिरुऊन अवघ्या ५ तासात चोरट्याला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, प्रकाश सीताराम कुंभार यांच्या घरातून आज सकाळी १५.५ ग्रॅम वजनाचे ३४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीचा शिक्का तसेच रोख ५ हजार रुपये असे एकूण ३९ हजार ८०० रुपयांची घरफोडी झाली होती. याबाबत प्रकाश कुंभार यांनी तक्रार दिली असता पोलिसांनी अवघ्या ५ तासात कुंभारवाड्यातीलच रवींद्र नारायण कुंभार यास ताब्यात घेतले. रवींद्र कुंभार याने चोरीही कबुली दिली असून चोरीस गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. डीवायएसपी पिंगळे व पो. नि. वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय शितलकुमार नाईक, हे. कॉ. सतीश सानप, पो. कॉ. तुषार मोरे, पी. कॉ. मंदार पाटील हे करीत आहेत.

Protected Content