Home क्राईम रसलपूर येथे अवैधरित्या देशी दारू बगळणाऱ्या एकास अटक

रसलपूर येथे अवैधरित्या देशी दारू बगळणाऱ्या एकास अटक

0
43

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील रसलपूर येथील आर्यन धाब्यासमोर २४९६ रुपये किमतीची देशी दारू जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे.

पुंडलिक दगडू महाजन (वय ३४ रा. रसलपूर) हा आर्यन ढाब्यासमोर देशी दारू बॉबी संत्रा १८० मिलीच्या २४९६ रुपये किमतीच्या ४८ बाटल्या अवैधरित्या बाळगून होता. त्यास पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. ही कारवाई डीवायएसपी पिंगळे, पो. नि. रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास हे. कॉ. राजेंद्र राठोड हे करीत आहेत.


Protected Content

Play sound