मोटारसायकलींची समोरा-समोर धडक : दोघे जागीच ठार !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन मोटारसायकलींची समोरा-समोर झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

मुक्ताईनगर शहराच्या नजीकच महामार्गावरील स्मशानभूमिच्या जवळ आज भीषण अपघात झाला. यात दोन मोटारसायकलींची धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली. परिसरातील लोकांनी येथे मोठी गर्दी केली. प्राप्त माहितीनुसार यात मयत झालेले दोघे हे मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथील रहिवासी होते. या अपघातात मृत झालेल्यांच्या आप्तांनी शासकीय रूग्णालयात केलेला आक्रोश पाहून वातावरण सुन्न झाले होते.

या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या अपघाताच्या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content

%d bloggers like this: