अनधिकृत बांधकाम? बिल्डर, महापौरांवर कारवाई करा- आ. राणा

मुंबई, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अमरावतीचे आ.रवि राणा खा.नवनीत राणा यांना मुंबईतील त्यांच्या खार येथील रहिवासी इमारतीत अनधिकृत बांधकाम केले असून ते १५ पंधरा दिवसात पाडा, अन्यथा कारवाई करण्याची नोटीस मुंबई मनपाने दिली आहे, यावरून आ. रवि राणा यांनी, अनधिकृत बांधकाम? बिल्डर महापौरांवर कारवाई करा, असे म्हटले आहे.

आ.रवि राणा,  खा.नवनीत राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासी इमारतीचे आठव्या मजल्यावरील बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. ते अनधिकृत बांधकाम १५ दिवसात काढून टाका अन्यथा महापालिका कारवाई करणार असल्याची नोटीस देण्यात आल्यावरून आ. रवि राणा यांनी या नोटीसला कायदेशीर उत्तर देणार असून या इमारतीचे बांधकाम मी केलेले नाही.

ज्या बिल्डर कडून मी घर घेतले, त्या बिल्डरला सर्व परवानग्या मुंबई पालिकेने आणि महापौर यांनी दिलेल्या आहेत. मुंबईत शिवसेनेचाच महापौर असून अधिकारीही तुमचेच आहेत. चुकीचे बांधकाम असेल तर इमारत बांधकामाला परवानगी दिलीच कशी? या परिसरातील इमारती एकाच बिल्डरने बांधकाम आहेत. त्या सर्व बिल्डींगची तपासणी करा, यात जे जे दोषी असतील अशा संबंधित बिल्डर, अधिकारी आणि महापौर यांच्यावर करा, अशी मागणी आ.रवि राणा यांनी केली आहे.

Protected Content