यावल येथे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

yaval news

यावल, प्रतिनिधी | येथील महसुल आणि पोलीस प्रशासनाव्दारे संयुक्तरित्या आज (दि.२८) सकाळी तालुक्यातील विविध ठिकाणी विनापरवाना अवैधरित्या गौणखनिजाची वाहतुक करणारे एक डंपर आणि दोन ट्रॅक्टर पकडुन कारवाई करण्यात आली आहे.

 

महसुल प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे पुनश्च काही दिवसांपासुन सक्रीय झालेल्या वाळु माफीयावर वचक बसेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वढोदे प्रगणे येथे आज या परिसरात तपासणी करीत असतांना चेतन माच्छिंद्र सोळंके (रा.कोळ न्हावी) हा चालवित असलेले वाहन (क्रमांक एम.एच.१९ झेड. ५७५०) यात सुमारे तीन ब्रास वाळुगौण खनिजाची विनापरवाना वाहतुक करतांना आढळुन आले , त्याचप्रमाणे न्हावी परिसरातील मोर नदीच्या पात्रात दोन ट्रॅक्टर्स (क्रमांक एम.एच.१९, ४५१५ आणि ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.१९, पी. ३८८९) या वाहनांमध्ये विनापरवाना गौण खनिजाची वाहतुक करतांना सुभेदार सिकंदर तडवी रा. बोरखेडा यास फैजपुरचे मंडळ अधिकारी जे. डी. बंगाळे, सचिन जगताप मंडळ अधिकारी किनगाव, साकळीचे मंडळ अधिकारी पी.ए. कडनोर, एस.एस. तायडे (तलाठी मनवेल), शरद सुर्यवंशी (तलाठी यावल), सी.डी. वानखेडे (तलाठी अंजाळे),पी.एन. नेहते (तलाठी चुंचाळे) आणि यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी संयुक्तरित्या सदरची अवैध गौणखनिज वाहतुक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Protected Content