कोरपावली ग्रामपंचायतीकडून शिक्षकांचा सत्कार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे शिक्षक दिना निमित्त आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शालेय पोषण आहार ( कडधान्य ) करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवा फांउडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावलीचे सरपंच जलील पटेल होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कडधान्य वाटप करण्यात आले व शाळेतील आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक धनराज कोळी, उपशिक्षक मुस्तफा तडवी, शिक्षक जाकीर शाह, रमेश काळे, निवृत्ती भिरुड यांचा ग्रामपंचायत , शालेय व्यस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, तुळशीदास कोळबे, इस्माईल तडवी, समिती अध्यक्ष जुम्मा तडवी, उपाध्यक्ष हमीद पटेल, समीर तडवी, अकिल तडवी, मुबारक तडवी,ग्रामपंचायत कर्मचारी किसन तायडे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content