पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आ. चंद्रकांत पाटील यांची मंत्र्यांसमवेत बैठक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसह पूरग्रस्तांच्या प्रश्‍नांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्यासोबत बैठक घेतली.

१६ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर मतदारसंघात झालेल्या जोरदार पावसामुळे ऐनपूर, निंबोल, विटवा, मेंढोळदा, नायगाव, बेलासवाडी, भोकरी, पातोंडी, यासह अन्य गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्या सोबत बैठक पार पडली.

या बैठकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील तापी व पूर्णा नदीच्या पुरामुळे होणारे नुकसान या संदर्भात चर्चा करण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी पूर नियंत्रण रेषा आखण्यात यावी अशी मागणी केली. घरांची झालेली पडझड, शेतीचे नुकसान, . केळीचे उभे पीक वाहून जाणे, शेतातील मोटारी पंप वाहून गेलेले आहेत तसेच ठिबक सिंचन प्रणाली देखील वाहून गेलेली आहे त्यामुळे शेतकर्‍यांचे व नागरिकांचे तापी व पूर्णा नदीच्या काठावरील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.

त्याचप्रमाणे केळीसाठी तीन टक्के पाणी हे आरक्षित ठेवण्यात आले आहे ते वाढवण्याची मागणी देखील त्यांनी याप्रसंगी केली. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पावसाळ्यात शेतकर्‍यांनी पंप काढले पाहिजे असे सांगितले यावर आमदार पाटील यांनी दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने केळीचे पीक अक्षरशः वाळून गेले असती त्यामुळे पंप कसे शेतकरी कसे काढणार? असा मुद्दा देखील त्यांनी मांडला.

याप्रसंगी महाराष्ट्रातील पाच धरणांचा गाळ काढण्याची प्रक्रिया एजन्सी मार्फत राबवण्याची योजना आखण्यात आली असून त्यामध्ये हातनुर धरण नसल्याने गाळ काढण्यासाठी आतनूर धरणाचा समावेश त्या योजनेत करण्यात यावा अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

Protected Content