पाण्यावरून फेकण्यावरून महिलेला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विदगाव येथे पाणी पिण्याच्या कारणावरून बादलीसह काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी चार जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

विदगाव येथे एकनाथ भिवा सोनवणे वय 68 पत्नी तसेच कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. ७ जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाणी फेकल्याने त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी एकनाथ सोनवणे यांची पत्नी विमलबाई या गेल्या असता त्यांना गावातीलच शेजारी पार्वताबाई किशोर नन्नवरे यमुनाबाई कैलास सोनवणे या दोन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत विमलबाईचे दोन दात पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ जून रोजी सकाळी विमलबाई या त्यांच्या मुलीशी बोलत असताना शिवीगाळ केल्याचा गैरसमज करून पार्वताबाई नन्नवरे यमुनाबाई सोनवणे ,कैलास सोनवणे, सचिन कैलास सोनवणे या चार जणांनी विमल भाई यांना घरासमोर येऊन केली सचिन सोनवणे यांनी त्यांच्या पायावर तर कैलास सोनवणे विमलबाई यांच्या छातीवर तसेच पाठीवर काठीने मारहाण केली. विमलबाई या गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विमलबाई यांचे पती एकनाथ सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर हे करीत आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!