तरूणाला डुलकी पडली महागात; रेल्वेखाली येऊन ठार

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मित्रांसोबत मुंबईला कामासाठी जाणाऱ्या तरूणाला डुलकी लागल्याने दरवाजातून पडून रेल्वेच्या चाकाखाली आल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची थरारक घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आज मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, “उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रमेश रमग्य पासवान हा २१ वर्षीय युवक आपल्या मित्रांसोबत गोरखपूर – मुंबई रेल्वेने (क्र. २०१०४) मुंबई येथे कामासाठी जात होता. रेल्वेने प्रवास करत असताना पासवान हा रेल्वेच्या दरवाजात बसलेला होता. तेव्हा त्याला अचानक झोपेची डुलकी आली आणि तो रेल्वेच्या चाकाखाली आला. त्यात तो जागीच ठार झाला.

सदर धक्कादायक घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रविवार मध्यरात्री १२:३५ वाजताच्या सुमारास घडली. येथून जवळ असलेल्या खडकी खांब नंबर- ३२१/२४-२२ दरम्यान हि घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला.

दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!