जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

पारोळा, प्रतिनिधी । भोंडणदिगर येथे जातीवाचक शिविगाळ, मारहाण करणाऱ्या तिघांवर शुक्रवारी पारोळा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

भोंडणदिगर येथील  गुलाब पीतांबर भील यांनी २० जानेवारीला पारोळा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यात गावातील कान्हीराम सुभा राठोड, संतोष सुभाष राठोड, ज्योती लाल राठोड व इतरांनी शेतातील वहिवाट रस्ताच्या वादावरून १२ डिसेंबरला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. त्यात जखमी झाल्याने फिर्यादीला पारोळा कुटीर रुग्णालय व तेथून धुळे येथे हलवण्यात आले होते. या तक्रारी अर्जाची चौकशी होऊन तिघांविरुद्ध कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करत आहेत.

Protected Content