खुशखबर : गिरणा धरण ओव्हरफ्लो ! सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार

Chalisgaon चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गिरणा धरण १०० टक्के भरले असून यामुळे खालील बाजूस असणार्‍या शिवारांमधील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे यावरील गिरणा धरण हे १०० टक्के पूर्ण भरले असल्याची माहिती जलसंपदा खात्यातर्फे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. अर्थात, धरण ओव्हरफ्लो झाले असून यातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. गिरणा धरणाच्या आजवरच्या ५३ वर्षांच्या इतिहासातच पहिल्यांदाच हे धरण लागोपाठ चौथ्या वर्षी पूर्ण भरल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

खरं तर यंदा जुलैमध्ये झालेल्या पावसामुळेच धरण ९० टक्के भरले होते. तेव्हापासूनच नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता धरण पूर्ण भरल्याने दोन दरवाज्यांमधून पाणी सोडले जात आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसातच धरणातील विसर्गाच्या प्राणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार आहे. यामुळे गिरणा काठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. महत्वाचे म्हणजे, गिरणेची उपनदी असणार्‍या मन्याडवरील धरण देखील पूर्ण भरले असून याचा विसर्ग हा गिरणा पात्रात सुरू आहे.

दरम्यान, गिरणा धरण भरल्याने दोन्ही काठांवरील गावांच्या सिंचनाला याच्या आवर्तनांचा लाभ होणार आहे. यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

Protected Content