तपासाची चक्रे फिरवताच गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील परमिटरूम व बिअरबार हॉटेल फोडून सुमारे ५४ हजार २२५ रुपयांचा देशी विदेशी दारू आणि रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे.

 याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील हॉटेल भगवती परमिटरूम व बियरबार हे दुकान मंगेश देविदास पाटील रा. ओमकार नगर यांच्या मालकीचे आहे. १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मंगेश पाटील यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने परमिटरूम व बिअरबारचे दुकान फोडून दुकानातील देशी-विदेशी दारू रोकड आणि इलेक्ट्रिक सामान असा एकूण ५४ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

हा प्रकार दुसऱ्या दिवशी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आला. या संदर्भात मंगेश पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील करीत होते.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तपास पथकातील सफौ.पुरुषोत्तम पाटील, पोना मिलिंद भाबरे, पोना सूर्यकांत साळुंखे यांना अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्या कार्याबद्दल असल्या गुणधर्माची माहिती संकलित करून त्यांच्याकडून पुन्हा प्रयत्न करणेबाबत सूचना दिल्या.

त्या दृष्टीने गुन्ह्याचा शोध सुरू असताना अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. रुबजी नगर, अमळनेर याच्यावरील संशय बळवल्याने त्याचे विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार भूषण प्रमोद सनेर रा. हातेड, ता. चोपडा, जिल्हा जळगाव याच्या सहाय्याने जळोद ता. अमळनेर येथून मोटरसायकल चोरी करून तिच्याने शहरातील अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील हॉटेल भगवती चोरी केल्याची असल्याचे कबुली दिली. या प्रकरणी शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी आणि भूषण प्रमोद सनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून ४८ हजार २८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Protected Content