रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे “स्वच्छता मोहीम”

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मोहिमेत सहभागी होत महाविद्यालयातील विविध विभागातील विध्यार्थी स्वयंसेवकांनी आज शिरसोली रोड परिसर, कृष्णा लॉंन परिसर, गणपती मंदिर परिसर व जकात नाक्याचा श्वास मोकळा केला.

 

रस्त्याच्या शेजारी साचलेला प्लास्टिक, जैविक कचरा असा सुमारे ८ टन कचरा संकलित केला. त्यामुळे या परिसराचे रूप पालटले. चार तासांच्या या मोहिमेत १०० हून अधिक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यस्थापन महाविद्यालयाने जळगाव शहरातील विविध अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याचा कृतिशील उपक्रम राबवण्याचा वज्रनिर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने शिरसोली रोड परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला. सकाळी दहा वाजता रायसोनी महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांनी ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ ही जनजागृती फेरी काढली.

 

रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते या फेरीचा प्रारंभ झाला. या अनुषंगाने शिरसोली रोडवर हि फेरी निघाली. जळगाव शहर स्वच्छतेचे आवाहन करत ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ असा संदेश जनजागृती फेरीतून देण्यात आला. त्यानंतर शिरसोली रोड परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. येथील परिसरात कित्येक दिवसांपासून कचरा साचल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती. यावेळी विध्यार्थी स्वयंसेवकांच्या स्वच्छतेनंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या उपक्रमाच्या समन्वयकानी जळगाव शहराच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना संपर्क साधला असता, डॉ. गायकवाड यांनी तत्काळ तिथे कचरा गाडीच्या सहाय्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावली.

 

पुढील काळात स्वच्छतेचे महत्त्व जपत शिरसोली रोडसह जळगाव शहरातील विविध भागाच्या संवर्धनाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वसिम पटेल, प्रा. राहुल त्रिवेदी व गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी हे या उपक्रमाचाठिकाणी उपस्थित होते.सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.

Protected Content