शेतातील झाड तोडण्यावरून शेतकऱ्याच्या हातावर विळा मारला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बुद्रुक येथे शेतातील झाड तोडण्याच्या कारणावरून शेतकऱ्याला विळा मारून दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी  नशिराबाद पोलीस ठाण्यात एका जनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे दीपक लक्ष्मण कोल्हे हे वास्तव्यास आहे, त्यांची भादली बुद्रुक शिवारातील गट नंबर 15 17 या ठिकाणी शेती आहे. 23 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावातीलच मोहन पुंडलिक चौधरी हे कोल्हे यांच्या शेताच्या सामूहिक बांधावरील बाभळीचे झाड विड्याने तोडत होते, याबाबत दीपक कोल्हे यांनी चौधरी यांना उद्देशून तुम्ही मला न विचारता झाड का तोडत आहात असे विचारले असता त्याचा राग आल्याने मोहन चौधरी यांनी दीपक कोल्हे यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान चौधरी यांनी कोल्हे यांच्या डाव्या हातावर विळा मारून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दुपारी दीपक कोल्हे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून मोहन पुंडलिक चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख हे करीत आहेत

Protected Content