शॉर्टसर्कीटमुळे केळीच्या बागाला आग; १५ लाखांचे नुकसान

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी शिवारातील केळीच्या बागेला विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याने शेतकऱ्याचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहीगाव येथील शेतकरी महेश पांडूरंग पाटील यांचे साकळी शिवारात शेत गट क्रमांक ७३१ मध्ये शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात ७ हजार ३०० केळीच्या खोडांची लागवड केली आहे. यातील काही केळीची कापणी झाली होती. मंगळवारी २६ एप्रिल रोजी दुपारी शेतातून गेलेल्या विद्यूत तारांच्या घर्षण होवून झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे केळीच्या बागाला अचानक आग लागली. या आगीत शेतातील केळीच्या पिकासह पाईप, ठिंबक नळ्या जळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्याचे सुमारे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी महेश पाटील यांनी सांगितले. आग लागल्याचे माहिती कळताच गावातील ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. दरम्यान ही आग इतरत्र पसरू नये यासाठी परिश्रम घेतले. नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत पोलीसात आगीची नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content