Home Cities अमळनेर प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लांबविली

प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लांबविली


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक परिसरात एका महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड असा एकूण २६ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे घडकीला आले आहे. याबाबत सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयश्री निलेश सूर्यवंशी (वय-२६) रा. देहू ता. जि. पुणे ह. मु. शिक्रुड ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जयश्री सुर्यवंशी या महिला कल्याण ते रावेर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९३०) ने अमळनेर शहरात आल्या होता. बसमधून उतरत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून २५ हजाराचा सोन्याच नेकलेस आणि दीड हजाराची रोकड असा एकुण २६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound