विहिरीत उडी घेवून तरूणाने संपविली जीवनयात्रा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुकातील हिंगोणा येथे विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून एका विवाहीत तरूणाची आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
.

या संदर्भात मिळालेल्या माहिती अशी की, राजाराम रमेश भिल्ल (वय-३५ रा. हिंगोणा ता. यावल) या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या तरूणाने हिंगोणा गावाच्या न्हावी मारूळ रस्त्यावरील बेघर वस्ती जवळ असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या विहीरीत ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान विहीरीत उडी घेवुन आपली जिवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. या घटनेची खबर गावातील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी दिल्याने फैजपुर पोलीस ठाण्यात अकसमात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे. मयत तरूणावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Protected Content