जामनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अल्पवयीन मुलगी ही दुकानावरून दूध घेऊन घरी येत असताना अज्ञात मुलाने तिचा हात पकडून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीने घरी जाऊन आई-वडिलांना सांगितला. संतप्त झालेल्या पीडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Protected Content