वादग्रस्त स्टेटसवरून शिरसोलीत दोन गटांमध्ये हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली येथे वादग्रस्त स्टेटसवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिरसोली गावातील काही तरूणांनी आपल्या व्हाटसऍप स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. दुसर्‍या गटातील तरूणांनी ही पोस्ट पाहिल्यामुळे वाद सुरू झाला. यामुळे दोन्ही गटांनी रात्री अकराच्या सुमारास एकमेकांवर दगडफेक करून हाणामारी करण्याचा प्रयत्न केला. यातच काही वाहने फोडण्यात आल्याने हा वाद चिघळला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले.

याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने शिरसोलीकडे धाव घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यात दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत उपद्रवींचा शोध घेतला जात होता. पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे हे आपल्या सहकार्‍यांसह शिरसोलीत दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. तर रात्रीच दंगा निवारण पथक शिरसोली दाखल झाले असून याबाबत औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content