रेकॉर्डवरील गुन्हेगार दुसऱ्यांदा हद्दपार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात नेहमी दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला सात वर्षांपुर्वी जिल्हाप्रशासनाने हद्दपार केले होते. आता त्याने पुन्हा दहशत निर्माण केल्याने उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी पुन्हा दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश शनिवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता काढले आहे. आकाश भास्कर विश्वे (३४, रा. भगवा चौक, सुप्रीम कॉलनी) असे गुन्हेगाराचे नाव आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आकाश विश्वे याची सुप्रीम कॉलनी परिसरात प्रचंड दहशत असल्याने त्याच्यावर २०१४ पासून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दुखापत करणे व इतर वेगवेगळे आठ गुन्हे दाखल आहे. त्याची दहशत पाहता त्याला २०१६ मध्ये एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील त्याने दहशत निर्माण करत गुन्हे करणे सुरूच ठेवले. या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी मंजुरी देत दोन वर्षांसाठी हद्दपार केले.

हद्दपारीच्या प्रस्तावाची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, निलोफर सैयद, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे, नरेंद्र मोरे यांनी केली. हद्दपार कालावधीत विश्वे याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.

Protected Content