जेम्स लेनने ‘त्या’ पुस्तकाबद्दल केला गौप्यस्फोट !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जेम्स लेन याने आपल्या ज्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी बदनामी केल्याचा आरोप आहे, त्याबाबत बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवली होती का ? याबाबत स्वत: एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वैचारिक लढाई जुंपली असून यात जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा संदर्भ देखील घेतला जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, इंडिया टुडे या नियतकालीकाने ई-मेलच्या माध्यमातून खुद्द जेम्स लेन यांनाच बोलत केले. इंडिया टुडेने जेम्स लेनला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लेन म्हणतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून कोणतीही माहिती घेतली नव्हती. त्या पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही. शिवरायांवरील पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे माहितीचा स्त्रोत नव्हते. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंसोबत कोणतीही चर्चा केलेली नव्हती. मी जे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये असा कोणताही उल्लेख नाही, वाचणार्‍याच्या ते लक्षात येतं. ज्यांनी टीका केली आहे, त्यांना या पुस्तकातील कथानक समजलेलं नाही, अशी प्रतिक्रिया जेम्स लेन यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे.

गुडी पाढवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यासंदर्भातील वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला. बाबासाहेब पुरंदरेंवर ज्यांनी टीका त्यांच्यावर राज ठाकरेंनी निशाणा साधला. परंतु, यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, पहिले ते जेम्स लेन याने गलिच्छ लिहिले होते, त्याचे कौतुक पुरंदरे यांनी केलं होतं हे म्हणणं सुद्धा गलिच्छ होतं. शिवजंयतीबाबत तर त्यांनी माफी सुद्धा मागितली. मग यावर जास्त बोलून काय उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी केली होती. यानंतर आता याच प्रकरणावरून जेम्स लेन यानेच प्रतिक्रिया दिल्याने यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होतील ही बाब स्पष्ट झाली आहे.

Protected Content