खासदार रक्षाताईंमुळे अकराशे भाविकांची आषाढी वारी !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार रक्षाताई खडसे यांच्यामुळे अकराशे भाविकांना पंढरपुरची वारी घठणार असून यासाठी बुक करण्यात आलेली विशेष रेल्वे उद्या रवाना होणार आहे.

यंदा आषाढी वारी पूर्ण क्षमतेने होणार असल्याने राज्यभरातील भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. यातच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी अकराशे स्त्री-पुरूष वारकर्‍यांसाठी स्वतंत्र रेल्वे गाडी बुक केली आहे. भुसावळ-पंढरपूर या मार्गावर शनिवारी ९ जुलै रोजी पंढरपूर वारी विशेष गाडी सुटणार आहे. या गाडीच्या ११०० तिकिटांची दोन्ही बाजूने खासदार रक्षा खडसे यांनी आगाऊ बुकिंग केली आहे.
खासदार रक्षा खडसे यांनी बुक केलेली रेल्वे गाडी ही उद्या शनिवार दिनांक ९ जुलै रोजी दुपारी १.३० भुसावळातून सुटेल. ती दुसर्‍या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी रविवारी १० जुलैला रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून सोमवारी ११ जुलैला दुपारी १ वाजेला भुसावळात पोहोचणार आहे.

Protected Content