रिक्षाच्या धडकेत जामनेरच्या दोन विद्यार्थीनी जखमी

Accident

जळगाव प्रतिनिधी । शाळेत पायी जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थींनी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजता जामनेर येथे घडली. दोन्ही विद्यार्थींनीना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पुजा समाधान केंद्रे (वय-11) आणि पुनम समाधान केंद्रे (वय-14) रा. जामनेर हे दोन्ही बहिणी सकाळी 6 वाजता शाळेत पायी जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिल्याने दोन्ही गंभीररित्या जखमी झाल्या. दोघांना रस्त्यावरील नागरीकांना तातडीने जामनेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्राथमोपचार करून त्यांना जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात रिक्षाचालक रिक्षा घेवून फरार झाला होता. रामांनद नगर पोलीसांनी समाधान केंद्रे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

Protected Content