आश्रय माझे घरला पालकमंत्र्यांकडून २ लाखांची देणगी ! ( व्ही डी ओ )

जळगाव : प्रतिनिधी । गतिमंद मुलांचा सांभाळ करणाऱ्या  आश्रय माझे घर या संस्थेला आज पालकमंत्री ना .  गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ २ लाख १ हजार रुपयांची देणगी जाहीर केली

 

‘आश्रय-माझे घर या संस्थेला रोटरी ईस्ट क्लबतर्फे  मिळालेल्या सोलर पॅनल व मातोश्री आनंदाश्रमात प्राप्त झालेल्या ओपन जिम साहित्य आणि ट्रान्सफॉर्मरचे  लोकार्पण आज पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते  मार्गदर्शन करीत होते

 

प्रौढ मतिमंद, गतिमंद आणि विकलांग मुलांचे आजीवन संगोपन करण्यासह त्यांना आत्मनिर्भर करणारी ‘आश्रय-माझे घर’ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेला देणगी स्वरुपात व  जिल्हा नियोजन व विकास निधीतून प्राप्त झालेल्या ओपन जिम साहित्य आणि ट्रान्सफॉर्मर यांचा लोकार्पण सोहळा  आज  शांतीवन परिसर, गिरणा पंपिंग रोड, मातोश्री आनंदाश्रम शेजारी, सावखेडा शिवार येथे  आयोजित करण्यात आला होता  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती सुशिल असोपा यांची उपस्थिती होती

 

या संस्थेच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा करीत पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी या संस्थेशी संबंधित डॉक्टर्स आणि संचालक मंडळाला खास धन्यवाद दिले . कोरोनाकाळातील सर्वच डॉक्टरांच्या कामाचा संदर्भ देत त्यांनी समाजातील अशा संस्था  टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत अशी आशा व्यक्त केली समाजातील दात्यांनाही त्यांनी पुढे येण्याचे आवाहन करताना त्यांनी सध्या येथे २० मुलांचा सांभाळ केला जातो ती संख्या ४० वर नेण्याचा संचालकांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला तुम्ही एका मुलाचा वर्षभराचा खर्च सांगा त्या अंदाजाच्या आधारे आपण दात्यांकडे जाऊ आणि त्यांना मदतीची विनंती करू असेही ते म्हणाले  समाजाकडून मिळणारी आर्थिक मदत पाण्यासारखी वाहती असावी साचलेले पाणी त्रासदायक ठरते तसे दात्यांनिहि आर्थिक मदतीचा ओघ ओघवता ठेवला तर नक्कीच या पुण्याच्या कामात आणखी चार  मदतीचे हात जोडले जातील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

 

हे साहित्याचे लोकार्पण उद्योगपती रो.सुशील आसोपा, डाँ प्रताप जाधव , भरतदादा अमळकर,  रोटरीचे अध्यक्ष भावेश शहा प्रकल्प प्रमुख संजय शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  या  कार्यक्रमात डाँ राहुल महाजन , सोनाली महाजन , डाँ सुशील गुजर, डाँ महेश बिर्ला , रो.स्वप्नील जाखेटे , हितेश्वर मोतीरामानी , वर्धमान भंडारी , डाँ अपर्णा मकासरे , डाँ रितेश  पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी रोटरी चे माजी अध्यक्ष डाँ जगमोहन छाबडा , अभय कांकरिया , विनोद पाटील , डाँ राहुल भंसाली , डाँ अमेय कोतकर ,विरेंद्र छाजेड , संग्रामसिंग सुर्यवंशी , विक्रम मुणोत , विजय कुकरेजा, राजेश साखला , पुर्वेश शहा, महेंद्र अग्रवाल , वल्लभ अग्रवाल उपस्थित होते  सुत्रसंचलन सौ संगीता अट्रावलकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशवस्मृती व आश्रय माझे घरचे सचिव अमीत पाठक , रेखा पाटील , योगेश पाटील , सागर येवले , रत्नाकर पाटील यांनी परीश्रम घेतले .

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/317454720089050

 

Protected Content