तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

chopda nukasan bharpai

चोपडा प्रतिनिधी । दोन दिवसापूर्वी चोपडा तालुक्यातील पुर्व भागातील अडावद – धानोरा गटातील पंचक, कमळगाव, चांदसणी, लोणी, खर्डी वगैरे गावांना जो वादळाचा तडाखा बसून शेतकरी बांधवांचे शेतात उभे असलेले पिक जमीनदोस्त होवून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले त्यासंदर्भात चोपडा शहर व तालुका काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष अॅड संदिप पाटील यांच्याहस्ते वादळी तडाखा बसलेल्या शेतकरी बांधवांचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.

तहसीलदारांना दिले निवेदन
यावेळी अॅड. संदिप पाटील यांनी नुकसानभरपाईसोबतच विजेचे खांब पडून जो विज पुरवठा खंडीत झाला आहे तो देखील तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यासंदर्भात तहसीलदार अनिल गावित यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, जिल्हा खजिनदार सुरेशबापू पाटील, माजी पं.स. सभापती प्रमोद पाटील, उत्तर महाराष्ट्र मिडीया प्रमुख संजीव बाविस्कर, जि.प. आरोग्य सभापती दिलीप युवराज पाटील, मार्केट माजी उप सभापती नंदकिशोर सांगोरे, अल्पसंख्याकचे आरीफ सिद्दीकी, सुतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, आबाजी पाटील, बायोटेकचे प्रमोद पाटील, सुनिल बागुले, संजिव सोनवणे, गणेश पाटील, रमाकांत सोनवणे, धनंजय शिंदे, मुन्ना साळुंखे, भिका माणकू पाटील, प्रविण सोनवणे, अॅड शिवराज पाटील,शरद धनगर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content