गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय स्पर्धा उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च MBA महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय बॉल बॅडमिंटन, बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही विभागातील पुरुष व महिला विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. जवळपास 200 च्या वर विद्यार्थी खेळावयास आलेले होते. सदर स्पर्धा 2 दिवस घेतल्या गेल्या. समारोप समयी जळगाव विभाग क्रिडा समितीचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत एस. वारके यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळा मध्ये मॅनेजमेंट कसे करावे आनि त्याचा फायदा कसा होईल हे खेळाडूंना पटवून दिले.

तसेच निवड होणार्‍या विद्यार्थ्यानी आपल्या विभागाचे तथा विद्यापीठाचे नावलौकिक वाढवण्याचे काम खेळाडूनी करावे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी एरंडोल विभागाचे सचिव डॉ. शैलेश पाटील आणी खाशाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव विभागाचे सचिव प्रा. चंद्रकांत डोंगरे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन जळगाव विभागाचे सह – सचिव डॉ.पी.आर. चौधरी यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. व्ही. एल.पाटील, डॉ. बोरसे, डॉ. देवदत्त पाटील, डॉ. व्ही.के.पाटील, डॉ. प्रतिभा ढाके, डॉ.चांद खा, प्रा. किशोर वाघ, प्रा. जे. बी. शिसोदे. प्रा.व्ही. व्ही. महाजन. प्रा. सुभाष वानखडे आदी उपस्थित होते.

Protected Content