धक्कादायक : अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; अत्याचारातून दिला मुलीला जन्म

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवाशी असलेली मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्या आईवडीलांनी लग्न लावून दिले तर पतीकडून झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिल्याचा खळबळजनक प्रकार बुधवार २७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि आईवडीलांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत आहे. ती अल्पवयीन आहे हे माहित असतांना तिच्या आईवडीलांनी तिचे लग्न उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका तरूणाशी लावून दिले. हे लग्न ऑगस्ट २०२२ मध्ये झाले. तिच्या पतीने देखील ती अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीतेने मुलीला जन्म दिला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरे आणि आईवडीलांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी २७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दयानंद सरवदे हे करीत आहे.

Protected Content