शेंदुर्णी येथे रथोत्सव भक्ती भावाने साजरा

शेंदुर्णी ता जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्री संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांचा त्रिकोण रथोत्सव यावर्षी २७८ व्या वर्षी मोठ्या धामधुमीत हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

 

रथाची सकाळी अमृत खलसे, विजयाताई खलसे नगराध्यक्ष ,सतीचंद्र काशीद ,उज्वला काशीद ,हभप शांताराम महाराज भगत आठवे गादी वारस कडोजी महाराज संस्थान ,शारदा भगत, शांताराम गुजर,आशा गुजर, तुषार भगत, योगिता भगत, यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संजय गरुड,गोविंद अग्रवाल, सागरमल जैन ,उत्तमराव थोरात, सुधाकर बारी, राजेंद्र पवार, निंबाजी भगत ,यात्रा कमिटी अध्यक्ष नगरसेवक शाम गुजर, हभप भागवत महाराज शिरसोलीकर, विजय पाठक, भूषण देवकर, गौरव पाठक, अॅड. देवेंद्र पारळकर, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, नगरसेवक शरद बारी , नगरसेवक पप्पू गायकवाड, विजय धुमाळ, धीरज जैन व आदी भाविक भक्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पूजा अर्चा आरती होऊन रथ त्रिविक्रम प्रदक्षिणेला निघाला. जैन मंदिर ते विनय कलेक्शनपासून युनियन बँक मार्गे राणी लक्ष्मीबाई पत संस्था चौक ते नुरानी मज्जित व तेथून गांधी चौकातून रथ घरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचला.

रथासमोर विविध सजीव देखावे  भाविकांचे आकर्षण ठरत होते. त्याचबरोबर महिला व पुरुषांची वेगवेगळे गट भजनी मंडळ परिसर दणाणून सोडत होते. नदीकिनारी यात्रा भरलेली आहे. कोरोना काळा नंतरची ही पहिली यात्रा असल्याने त्या प्रमाणात मोठीच गर्दी दिसत असून यात्रा पंधरा दिवस चालणार आहे असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्याम गुजर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे, पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या नियोजनात विविध पोलीस महिला पोलीस विविध ठिकाणी गस्त ठेवून चौक बंदोबस्त करीत होते.

 

Protected Content