किनगाव येथे भागवत महापुराण कथेला सुरुवात

यावल प्रतिनिधी । किनगाव येथील बऱ्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गालगत असलेल्या व्यंकटेश बालाजी इंटरप्राईजेस संचलित व्हि.मार्टच्या प्रांगणात आजपासून श्रीमद् भागवत महापुराण कथा वाचन सप्ताहाला सुरुवात होत आहे.

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन व श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पंढरपुरचे अध्यक्ष ह.भ.प.विजयकुमार पाटील यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने किनगाव येथील बऱ्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गालगत असलेल्या व्यंकटेश बालाजी इंटरप्राईजेस संचलित व्हि.मार्ट च्या प्रांगणात आजपासून श्रीमद् भागवत महापुराण कथा वाचन सप्ताह ठेवण्यात आलेला आहे.

गुरूवार दि.३० डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या भागवत महापुराण कथेचे वाचन ह.भ.प.शब्दप्रभू श्री पोपट महाराज कासारखेडा हे करणार आहेत या सप्ताह दरम्यान पहाटे ५ ते ६ काकडा तर सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा वाचन होणार असून गुरूवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता ह.भ.प.भाऊराव महाराज पाटील सेवानिवृत्त प्राचार्य मुक्ताईनगर यांच्या काल्याच्या किर्तनाने या भागवत कथेची सांगता होणार आहे या कार्येक्रमाचे आयोजन स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष,गाँडस्मिथ चँरीटेबल ट्रस्टचे संचालक इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल चे सचिव मथुराई गोवर्धन गोशाळा, श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था पंढरपूर  व्हि.मार्ट चे संचालक किनगाव वि.का.सोसा.चे संचालक व यावल तालूका मराठा समाजाचे उपाध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील यांनी केले आहे तर परीसरातील सर्व सामाजीक कार्येकर्ते मंडळांचे या कार्येक्रमाला सहकार्ये लाभणार असून परीसरातील भावीकांनी या श्रीमद् भागवत महापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मनिष पाटील यांनी केले.

 

Protected Content