भीमशाहीर प्रतापसिंहदादा बोदडे यांना आज अभिवादन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम आंबेडकरी गायक-गीतकार, शाहीर आणि कव्वाल कालकथित प्रतापसिंहदादा बोदडे (Pratapsingh Bodade ) यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी आज रिपाइं आठवले गटातर्फे प्रवर्तन चौकात सायंकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून याला ना. रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.

महाकवि वामनदादा कर्डक यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे मुक्ताईनगरचे थोर सुपुत्र कालकथित प्रतापसिंहदादा बोदडे यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रिपाइं आठवले गटातर्फे येथील प्रवर्तन चौकात आज सायंकाळी सहा वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, परिवर्तन कला महासंघाचे कार्याध्यक्ष साहेबराव सुरवाडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सभेचे आयोजन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, खान्देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव, युवक जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे आणि परिवर्तन कला महासंघाने केले आहे. प्रतापसिंहदादा बोदडे यांच्या चाहत्यांनी या अभिवादन सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: