भुसावळ-बडनेरा मेमो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन

Bhusawal1

भुसावळ प्रतिनिधी । मध्य रेल्वे प्रशासनातर्फे प्रवश्यांच्या सोयीसाठी भुसावळ ते बडनेरा मेमो रेल्वेची सुरूवात आज पासून करण्यात आली. आज सकाळी ६ वाजता मंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मेमो रेल्वेची सुरूवात केली.

यावेळी भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, आमदार संजय सावकारे, रेल्वे मंडळाधिकारी विवेक गुप्ता, वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा, वरिष्ठ मंडळ अभियंता गृह व पर्यावरण प्रबंधन रामचंद्रन, वरिष्ठ मंडळ अभियंता लक्ष्मी नारायण मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरूण, कुमार सहाय्यक प्रबंधक अजय कुमार, स्टेशन डायरेक्टर अयर, स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव मेमो ट्रेनचे लोकोपायलट राम वर्मा आणि गार्ड पी.व्ही.सोनवणे यांची उपस्थिती होती.

Protected Content