
जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने दीपस्तंभ फाउंडेशन येथे दिव्यांग भगिनींसोबत रक्षाबंधनाचा सण अत्यंत आपुलकी, प्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजात दुर्लक्षित राहिलेल्या दिव्यांग भगिनींप्रती सन्मान आणि स्नेहाची भावना व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
हा उपक्रम स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेतून पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते तथा ‘लाडकी बहीण’ योजनेचे जनक मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बहिणींनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना राखी बांधून प्रेमाचे व संरक्षणाचे वचन घेतले.
या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेत्या सरिता कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, जळगाव महानगरप्रमुख संतोष (आप्पा) पाटील आणि युवा सेनेचे संघटक किशोर भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली. या सर्व नेत्यांनी उपक्रमाचे कौतुक करत उपस्थितांशी संवाद साधला.
सदर कार्यक्रमाचे नेटके आयोजन भूषण भोळे, राहुल पाटील, विशाल महाजन, प्रशांत कोडी, महेश पाटील, तुषार चौधरी, शंतनु नारखेडे, ओम बारी, रंजन पाटील, रोहित पाटील, गणेश चौधरी, शेखर चौधरी, गणेश बच्छाव, निलेश पवार, योगेश पाटील, प्रशांत चौधरी, ओम चौधरी, चेतन चौधरी, मुन्ना तांडे, आकाश पाटील, दीपक बारी आणि संतोष पाटील यांनी केले. या सोहळ्याला शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



